Home नाशिक नाशिक गोळीबार प्रकरणः भाजप नेत्याच्या निकटवर्तीयांना अटक

नाशिक गोळीबार प्रकरणः भाजप नेत्याच्या निकटवर्तीयांना अटक

Breaking News | Nashik Firing: विसे मळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी शहर गुन्हे शाखेने बागूल समर्थक मामा राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना अटक.

Nashik firing case BJP leader's close aides arrested

नाशिकः विसे मळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी शहर गुन्हे शाखेने बागूल समर्थक मामा राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवार (ता. १३) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विसे मळा परिसरात बागूल समर्थक संशयितांनी सचिन साळुंखे या युवकावर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील बागूल यांचा पुतण्या व मुख्य संशयित अजय बागूल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही; परंतु पोलिसांनी अजय बागूल याच्या टोळीतील सदस्यांना अटक करण्याचे काम सुरू केले आहे. गुरुवारी (ता. ९) सुनील बागूल यांचा निकटवर्ती मामा राजवाडे ऊर्फ बाळासाहेब राजवाडे यास गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने चौकशीसाठी बोलावले होते. राजवाडे याने चौकशीत पोलिसांना अपेक्षित सहकार्य न केल्याने रात्री उशिरा त्यास अटक करण्यात आली; तर अजय बागूल याचा निकटवर्ती अमोल पाटील यास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

दोघांना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागूल यांचे दोन पुतणे गौरव व सागर बागूल यांच्यासह आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली; तर गोळीबार करणारे तुकाराम चोथवे, अजय बोरीसा यांच्यासह मुख्य सूत्रधार अजय बागूल फरारी आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली; तर सुनील बागूल हे पुतण्याच्या बचावासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, पोलिसांची कारवाई पाहता त्यांच्या अडचणींत वाढ होईल, असे चित्र आहे.

Breaking News: Nashik firing case BJP leader’s close aides arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here