कांद्याला पाणी देताना विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: कांदा पिकाला पाणी विजेचा देताना धक्का बसून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू , वन विभागातून होते सेवानिवृत्त.

केडगाव : शेतात कांदा पिकाला पाणी विजेचा देताना धक्का बसून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. जेऊर शिवारातील लिगाडे वस्तीवर गुरुवारी (९ ऑक्टोबर) ही घटना घडली. भीमराज परबत तोडमल (वय ६७, रा. जेऊर बायजाबाई, ता. नगर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
घुरुडी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या शेतात कांद्याला पाणी देण्यासाठी भीमराज तोडमल हे गुरुवारी गेले होते. पिकाला पाणी देताना विजेच्या केबलला स्पर्श झाल्याने त्यांना शॉक बसला. त्यामुळे ते बेशुद्ध पडले. दुपारी १२
च्या सुमारास त्यांचा मुलगा रविराज जेवणाचा डबा घेऊन शेतात गेला असता, त्यांना भीमराज हे शेतात बेशुद्धावस्थेत आढळून आले. तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. याबाबतचा अहवाल एमआयडीसी पोलिसांना प्राप्त झाल्यावर त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पो.हे.कॉ. शिंदे हे करीत आहेत. मृत भीमराज तोडमल हे वनविभागात अधिकारी होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते शेती करीत होते. ‘तात्या’ नावाने ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. युवराज तोडमल यांचे ते वडील होत. मृतभभीमराज तोडमल हे वनविभागात अधिकारी होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते जेऊर येथे शेती करीत होते.
Breaking News: Farmer dies after being electrocuted while watering onions
















































