Breaking News | Ahilyanagar News: श्रीरामपूर-नेवासा मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाखाली अनोळखी इसमाचा डोके नसलेला मृतदेह आढळला.

श्रीरामपूर : श्रीरामपूर-नेवासा मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाखाली अनोळखी इसमाचा डोके नसलेला मृतदेह आढळला आहे. सोमवारी रेल्वे पोलिसांनी ही बाब समजली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती स्थानक प्रबंधकांना दिली. त्यानंतर रेल्वे पोलिस तसेच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनोळखी इसमाचा मृतदेह बाजूला घेण्यात आला. व्यक्तीचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे असून, तो रंगाने सावळा, शरीर बांधा सडपातळ, उंची पाच फूट असून, त्याचे डोके नाही. अंगात जांभळ्या रंगाचा शर्ट, चॉकलेट रंगाची पॅन्ट आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अज्ञात मृतदेहाची माहिती असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
Breaking News: Dead Body found on railway track
















































