Home संगमनेर संगमनेर धक्कादायक घटना! सख्खा चुलत बहीणींची आत्महत्या, अनंत चतुर्दशीच्या दिवशीच….

संगमनेर धक्कादायक घटना! सख्खा चुलत बहीणींची आत्महत्या, अनंत चतुर्दशीच्या दिवशीच….

Breaking News |  Sangamner Suicide: साकूरमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना अनंत चतुर्दशीच्या दिवशीच घडल्याची बातमी समोर.

Sakur Suicide of cousins

संगमनेर: तालुक्यातील साकूरमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना अनंत चतुर्दशीच्या दिवशीच घडल्याची बातमी समोर आलीय. साकूर शिवारातील बनवस्ती येथील सख्ख्या चुलत बहीणींनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. कु. तन्वी अजित सगळगिळे ( वय १७) व मानसी राजेंद्र सगळगिळे (वय १५) असे आत्महत्या केलेल्या तरूणींची नावे आहेत. मात्र या घटनेने संपूर्ण पठार भागात खळबळ उडाली आहे.

अधिक मिळालेली माहिती अशी की, साकूर शिवारातील बन वस्ती येथे सगळगिळे कुटुंब राहत आहे. सगळगिळे कुटुंबातील सदस्य शनिवारी शेतात कामाला गेले होते. तसेच तन्वी अजित सगळगिळे व मानसी राजेंद्र सगळगिळे या दोघी घरीच होत्या. मात्र दुपारी चारनंतर तन्वी ने एकाघरात व मानसीने दुसऱ्या घरात गळफास घेतल्याचे समोर आले. यात मानसी इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. या घटनेत मानसीने गळफास घेतल्याची माहिती समजताच आसपासच्या काही व्यक्तींनी तीला तातडीने साकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तीचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलिस उपनिरीक्षक बांधले, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर रूग्णवाहिकेला पाचारण करून दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथे पाठविण्यात आले.

मात्र तन्वी आणि मानसीने एकाच वेळी असे टोकाच पाऊल का उचलले? अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. मात्र दोघीही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. मात्र ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही घटना घडल्याने पठार भागात शोककळा पसरली आहे.

Breaking News: Sakur Suicide of cousins

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here