Breaking News | Sangamner: पोलिसांनी दिला इशारा : गणेश विसर्जन मिरवणूक, गवंडीपुरा मशीद ते संगमनेर नगर परिषदेच्या चौकापर्यंत डीजे वाजविण्यावर मनाई करण्यात आली.

संगमनेर : संगमनेरातील नागरिकांनी डीजे वाजविण्यावर सक्त हरकत घेतली आहे. त्या अनुषंगाने गवंडीपुरा मशीद ते संगमनेर नगर परिषदेच्या चौकापर्यंत डीजे वाजविण्यावर मनाई करण्यात आली आहे. सर्व गणेश मंडळांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिला आहे.
गणेशोत्सवानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनातील सभागृहात शांतता समितीची बैठक झाली होती. या बैठकीत श्रीरामपूर उपविभागाचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी डीजेबाबत कठोर भूमिका घेतली होती. मात्र, श्रीगणेश आगमनानिमित्त संगमनेरात निघालेल्या मिरवणुकांमध्ये कर्णकर्कश आवाजात डीजे वाजले गेले, याकडे स्थानिक पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. त्यामुळे डीजेबंदीचे काय झाले, असा प्रश्न संगमनेरकर नागरिकांनी उपस्थित केला. ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणीही करण्यात आली. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांना गुरुवारी (दि. २८) निवेदन देण्यात आले होते. मेनरोडवरील व्यापारी व रहिवासी नागरिकांनी मेनरोडने डीजे नेण्यास आणि वाजविण्यास सक्त हरकत घेतली आहे. त्या अनुषंगाने गवंडीपुरा मशीद ते नगर परिषदेच्या चौकापर्यंत डीजे वाजविण्यावर मनाई करण्यात आली.
Breaking News: Action will be taken if DJ plays
















































