संगमनेर तालुक्यात महिलेचा खून, तरुणाच्या हत्येची धक्कादायक घटना अन आता…
Breaking News | Sangamner Crime: मृतदेह घराशेजारील वनविभागाच्या जंगलात आढळून आला. त्यांच्या गळ्यावर खुणा असल्याने हा खून असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

संगमनेर: संगमनेरमधील आश्वी बुद्रुक येथे किरकोळ वादातून एका तरुणाच्या हत्येची धक्कादायक घटना घडल्यानंतर, काही तासांतच तालुक्यातील जाखुरी येथे एका महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे नाव संगीता भारत मोरे (वय ४०, रा. नादनठाण, ता. वैजापूर) असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती भारत मोरे याला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.
संगीता मोरे, त्यांचे पती भारत मोरे आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती जाखुरी येथील जावई सोमनाथ सुरशे यांच्या घरी मुक्कामी आले होते. रविवारी रात्री सर्व कुटुंबियांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर संगीता मोरे झोपी गेल्या. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या वनविभागाच्या जंगलात आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह पोलिसांनी, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या गळ्यावर खुणा असल्याने हा खून झाल्याचा तसेच पती-पत्नीत वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केले. ‘सीमा’ नावाच्या श्वानाने आरोपीच्या चपलांचा वास घेत घरापासून ते मृतदेह सापडलेल्या ठिकाणापर्यंतचा माग काढला.
पोलिसांनी तात्काळ पती भारत मोरे मोरेला ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत आलेल्या अज्ञात व्यक्तीचा या गुन्ह्यात सहभाग होता का, याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Breaking News: Murder of a woman and murder of a young man in Sangamner taluka and now
















































