Home संगमनेर संगमनेर: फोटो व्हायरल करून पाच लाखांची मागणी

संगमनेर: फोटो व्हायरल करून पाच लाखांची मागणी

Sangamner Crime: दोघांचे वैवाहिक जीवन संपुष्टात येईल, असे माहित असतानाही साखरपुड्याचे जुने फोटो व्हायरल करून त्या बदल्यात पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Demanding five lakhs by making the photo viral

संगमनेर : दोघांचे वैवाहिक जीवन संपुष्टात येईल, असे माहित असतानाही साखरपुड्याचे जुने फोटो व्हायरल करून त्या बदल्यात पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील एक तरुणी व एका तरुणाची बदनामी होईल व या दोघांचेही वैवाहिक जीवन संपुष्टात येईल, असे माहित असताना देखील शहरातील तिघा जणांनी त्यांचे जुने साखरपुड्याचे फोटो व्हायरल करून त्याबदल्यात पाच लाख रुपयांची मागणी केलेली आहे.  तरुणीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने जमा झाल्या होत्या. यातील काही महिलांनी आरोपींपैकी एकाला चांगलाच चोप दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, शहरातील एका तरुणीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी ओकार मारूती राऊत, गोविंद राम नागरे यांच्यासह एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल त्यामुळे संतापलेल्या सदर केला आहे.

Web Title: Demanding five lakhs by making the photo viral

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here