फडणवीस सरकारमध्ये शपथविधी झालेल्या ३९ मंत्र्यांची यादी
Maharashtra Minister List 2024: भाजपचे 19, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 10 मंत्र्यांचा समावेश.
नागपूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूर येथे पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे 19, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 10 मंत्र्यांचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला.
महायुती मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रगीताने सुरूवात झाली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला, भाजपने विधानसभेत तब्बल 132 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41 आणि शिवसेना शिंदे गटानं 57 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात तीन दशकांनंतर राज्य सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी मुंबईऐवजी नागपुरात झाला. महाराष्ट्रात यापूर्वी 1991 मध्ये नागपुरात शपथविधी सोहळा पार पडला होता. त्यानंतर आता शपथविधी पार पडला.
हे आमदार झाले मंत्री:
– शिवसेना आमदार योगेश कदम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
– राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
– भाजप आमदार पंकज भोयर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
– शिवसेना आमदार आशिष जैस्वाल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली
– भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
– शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
– राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
– भाजप आमदार आकाश फुंडकर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
– भाजप आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
– राष्ट्रवादीचे आमदार मकरंद जाधव यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
– शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
– भाजप आमदार संजय सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
– शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
– राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
– राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
– राष्ट्रवादीचे आमदार आदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजप आमदार आशिष शेलार यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
– शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
– भाजप आमदार अतुल सावे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
– भाजप आमदार अशोक उईके यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
– भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
– भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
– भाजप आमदार जयकुमार रावल यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
– भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ.
– शिवसेना आमदार उदय सामंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
– राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– शिवसेना आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– शिवसेना आमदार दादा भुसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
– भाजप आमदार गणेश नाईक यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
– शिवसेना आमदार गुलाबराव पाटील घेतली मंत्रिपदाची शपथ.
– भाजप आमदार गिरीष महाजन यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
राज्य मंत्रिमंडळाचा आजच विस्तार केला आहे, आज 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्य मंत्री आहेत. आजपासून आम्ही आमचा गतीशील कारभार सुरू केला आहे. खातेवाटप कधी असा तुमचा प्रश्न असेल, तर येत्या दोन दिवसात आम्ही खाते वाटप पूर्ण करू, त्याबद्दल आमची सर्व क्लियारीटी झाली आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
Web Title: Maharashtra Minister List 2024
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study