Home संगमनेर संगमनेरचे आ. अमोल खताळ खास टोपी घालून विधानभवनात, टोपी घालण्यामागचे कारणही सांगितले.

संगमनेरचे आ. अमोल खताळ खास टोपी घालून विधानभवनात, टोपी घालण्यामागचे कारणही सांगितले.

Sangamner MLA Amol Khatal: बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणारे नवखे आमदार अमोल खताळ पाटील यांनी टोपी घालत विधानभवनात प्रवेश.

come Amol Khatal wearing a special cap in Vidhan Bhavan

संगमनेर : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यात प्रचंड मोठे यश मिळवले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अनेकांना महायुतीच्या नवख्या उमेदवारांनी पराभवाचा धक्का दिला आहे. यामध्ये संगमनेरमधून शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) अमोल खताळ यांनी काँग्रेसचे ८ वेळचे आमदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला आहे. आता आज विधिमंडळांच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी समारंभ होणार आहे. यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ विधिमंडळ परिसरात खास टोपी घालून आले आहेत. यावेळी त्यांनी ही टोपी घालण्यामागचे कारणही सांगितले.

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी विधिमंडळ परिसरात संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढील पाच वर्षांच्या काळात मतदारसंघासाठी काय करणार हे सांगितले. यावेळी त्यांच्या डोक्यावर खास भगवी टोपी असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भगवी टोपी घालण्यामागचे कारण विचारल्यावर आमदार खताळ म्हणाले, “ही टोपी घालण्यामागे कोणताही वेगळा हेतू नाही. पण, ज्यावेळी मी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करायला निघालो होतो, तेव्हा मतदारसंघातील युवकांनी ही टोपी दिली होती. तेव्हापासून ही टोपी माझ्यासाठी चांगला शकुन ठरत आहे.”

दरम्यान “माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आमदार बनण्याची संधी मिळाली ते केवळ संविधानामुळेच, आज संविधानामुळेच आठ वेळा आमदार झालेले बाळासाहेब थोरात यांना पराभूत करु शकलो”, असे वक्तव्य संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी केले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त खताळ हे चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. विरोधकांनी लोकसभेला संविधानाबाबत फेक नरेटिव्ह चालवले होते, मात्र जनतेने त्यांना या विधानसभेत उत्तर दिले असल्याचेही खताळ म्हणाले.
 
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंत काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी गेली ४० वर्षे सलग आठवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी काँग्रेसच्या एकहाती वर्चस्वाला सुरुंग लावला. खताळ यांनी बाळासाहेब थोरातांचा १० हजार ५६० एवढ्या मतांनी पराभव केल्याने ते ‘जायंट किलर’ ठरले.

Web Title: come Amol Khatal wearing a special cap in Vidhan Bhavan

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here