अहिल्यानगर: धार्मिक कार्यक्रमाहून परतताना अपघातात माय लेकाचा मृत्यू
Ahilyanagar Accident: जोराची धडक होऊन दुचाकीवरील माय-लेक अपघातामध्ये मृत पावले.
पाथर्डी : धार्मिक कार्यक्रमातून परतत असताना सोमनाथ खेडकर, ताराबाई खेडकर हे दुचाकीवरून जाणाऱ्या माय- लेकाचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे. सोमनाथ पुंडलिक खेडकर (वय २०), ताराबाई पुंडलिक खेडकर (वय ६०, रा. करोडी, ता. पाथर्डी) असे मृत झालेल्या माय-लेकाचे नाव आहे. तालुक्यातील कारेगाव येथे शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी ही घटना घडली आहे.
बीड-पाथर्डी राज्य महामार्गावर कारेगाव शिवारात मोहटा देवीकडून येणाऱ्या चारचाकी (एमएच १६ बीएच ३१५२) व दुचाकी यात जोराची धडक होऊन दुचाकीवरील माय-लेक अपघातामध्ये मृत पावले. खेडकर माय-लेक एका धार्मिक कार्यक्रमाला गेले होते. तो कार्यक्रम उरकून पाथर्डीहून करोडीकडे दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला.
अपघात इतका भीषण होता की, चारचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन गाडी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन आदळली. या गाडीतील ही प्रवाशी जखमी झाले आहेत.
Web Title: Accident Mother and daughter died in an accident while returning from a religious function
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study