Home संगमनेर संगमनेर तालुक्यात या ग्रामपंचायतवर फडकला महायुतीचा भगवा

संगमनेर तालुक्यात या ग्रामपंचायतवर फडकला महायुतीचा भगवा

Sangamner Grampanchayat Election: निवडणुकीनंतर ग्रामपंचायतवर अखेर महायुतीचा भगवा फडकला.

Election saffron of Mahayuti flew over this village panchayat in Sangamner taluka

संगमनेर: तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नांदुरी दुमालाच्या सरपंचपदी महायुतीचे आमदार अमोल खताळ आणि माजी सरपंच अॅड. मीनानाथ शेळके समर्थक निखील प्रमोद निळे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतवर अखेर महायुतीचा भगवा फडकला आहे.

नांदुरी दुमाला ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना मीनानाथ शेळके यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अॅड. मीनानाथ शेळके हे काँग्रेस सोडून माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये दाखल झाले होते. या ग्रामपंचायतवर अनेक वर्षांपासून त्यांचेच वर्चस्व होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अमोल खताळ, माजी सरपंच अॅड. मीनानाथ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदासाठी महायुतीकडून निखील प्रमोद निळे तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात समर्थक काँग्रेसकडून किसन कवडे या दोघांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यानुसार मतदान प्रक्रिया पार ६ यांना निळे झाली त्यांना केली अर्चना सरपंचपदी निखील निळे यांची झाली निवड पडली. या निवडणुकीत महायुतीचे निखील निळे यांना तर काँग्रेसचे किसन कवडे ५ मते मिळाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती ससे यांनी निखील यांची सरपंचपदी निवड असल्याचे जाहीर केले. सहाय्य म्हणून ग्रामसेवक अशोक गुंजाळ यांनी मदत . यानंतर माजी सरपंच शेळके, अॅड. मीनानाथ आहे. शेळके, सोमनाथ नेहे व उपसरपंच सोनबा पथवे यांनी नवनिर्वाचित सरपंच निळे यांचा सत्कार केला. या निवडीबद्दल माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Election saffron of Mahayuti flew over this village panchayat in Sangamner taluka

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here