Home अकोले भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन

भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन

Madhukar Pichad Passes Away: ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते.

Madhukar Pichad Passes Away

अहिल्यानगर : ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील खासगी रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू होते. आज पिचड यांची प्रकृती आणखी खालावली. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांनी अनेक महत्त्वाची राजकीय पदं सांभाळली आहेत. आदिवासी समाजातील कार्यकर्ते आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज्य सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणूनही अनेक वर्षे काम केलं आहे. मधुकर पिचड यांनी १९८० ते २००९ पर्यंत नगर जिल्ह्यातील (आताचा अहिल्यानगर) अकोले विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. तर मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात ते मविधानसभेत विरोधी पक्षनेते होते.

सुरुवातीच्या काळात शरद पवार यांचे खंदे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांची खरी राजकीय ओळख. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. परंतु 2019 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला .

मधुकर पिचड यांनी सहकार क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. अमृतसागर दूध सहकारी संस्था अकोले त्यांनी स्थापना केली. तसंच अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना करुन संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं.

मधुकर पिचड यांचा जन्म 1 जून 1941 रोजी महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशिनाथ पिचड हे एक शिक्षक होते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बी ए एल एल बी करुन वकिलीची शिक्षण पूर्ण केलं. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला सत्तरच्या दशकात जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि नंतर पंचायत समिती अकोले तालुका अध्यक्ष म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.

Web Title: Madhukar Pichad Passes Away

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here