Home अकोले अकोलेत अवैध दारु विक्रेत्यावर छापा

अकोलेत अवैध दारु विक्रेत्यावर छापा

Akole Crime: अवैधरित्या दारु विक्रेत्यावर अकोले पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (दि.२८) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास छापा टाकून देशी-विदेशी दारुसह ५५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

अकोले: तालुक्यातील कोंभाळणे अवैधरित्या दारु विक्रेत्यावर अकोले पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (दि.२८) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास छापा टाकून देशी-विदेशी दारुसह ५५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 कोंभाळणे येथे अवैध दारु विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने छापा टाकला असता अकोले पोलिसांकडून ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त संतू हनुमंत सदगीर (वय ५९) हा दारु विक्री करताना मिळून आला. त्याच्याकडून ५३ हजार ६९० रुपयांची देशी दारु आणि १३६० रुपयांची विदेशी दारु असा एकूण ५५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोकॉ. प्रदीप बढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संतू सदगीर याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. खाडे हे करत आहे. या कारवाईने अवैध धंदेचालकांत खळबळ उडाली आहे.

Web Title: Raid illegal liquor seller in Akole

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here