अहिल्यानगर: कार-दुचाकी अपघातात महिलेचा जागीच मृत्यू
Ahilyanagar Accident : मोटारकारच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जागीच ठार.
नगर : नगर – मनमाड रस्त्यावरील एमआयडीसी येथील दूधडेअरी चौकात बुधवारी (दि. २७) रोजी दुपारी भरधाव मोटारकारच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली.
सरिता शरद मेहेर (वय ६४, रा. सारसनगर) असे त्यांचे नाव आहे. सरिता या दुचाकीवर दातांच्या दवाखान्यात तपासणीसाठी नगर-मनमाड महामार्गाने विळद घाटाच्या दिशेने चाललेल्या होत्या. दुपारी ४.३० च्या सुमारास एमआयडीसी परिसरात दूधडेअरी चौकात भरधाव कारची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. परिसरातील नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दवाखाना ड्युटीवर असलेले तोफखाना पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार बोरुडे यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.
Web Title: woman died on the spot in a car-bicycle accident
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study