पतीच्या मोठ्या भावाने घरात घुसून महिलेवर बलात्कार, सहा जणींचा विनयभंग
Breaking News | Nashik Crime: दिवाळीच्या धामधुमीत एका महिलेवर पतीच्या मोठ्या भावाने बलात्कार (raped) केल्याची धक्कादायक घटना घडली.
नाशिक : मुलीवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. यात दिवाळीच्या धामधुमीत एका महिलेवर पतीच्या मोठ्या भावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या सहा जणींच्या विनयभंगप्रकरणी अंबड, सातपूर, देवळाली कॅम्प व सरकारवाडा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील तीन प्रकार सिडको भागात घडले असून, पीडितांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्काराचा प्रकार लेखानगर भागात घडला. इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. महिला शनिवारी (दि.२) रात्री आपल्या घरात एकटी असताना ही घटना घडली. लहान भाऊ कामावर गेल्याची संधी साधत शेजारी राहणाऱ्या तिच्या पतीच्या मोठ्या भावाने घरात घुसून महिलेवर बलात्कार केला. सकाळी कामावरून परतलेल्या पतीस महिलेने आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलिसांत पोहोचला असून, अधिक तपास उपनिरीक्षक नितीन फुलपगारे करीत आहेत.
दुसरा प्रकार खुटवडनगर येथील जनकनगरी भागात घडला. पीडिता गेल्या २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या घरात असताना संशयित सुरेश दलोड व त्याचे दोन साथीदार महिलेच्या घरी आले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घ्यावी, या कारणातून संशयितांनी कुरापत काढून पीडिता व तिच्या पतीस मारहाण केली. यावेळी संशयितांनी जिवे ठार मारण्याची धमकी देत पीडितेचा विनयभंग केला. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.
तिसरी घटना अंबड औद्योगिक वसाहतीत घडली. चुंचाळे शिवारातील घरकुल भागात महिला वर्ग शनिवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास आपापल्या घरासमोर रांगोळी काढत असताना ज्ञानेश्वर पवार (वय ३५) या संशयिताने जवळ जाऊन त्यांचा विनयभंग केला, तर एका मुलीस पैशांचे आमिष दाखवत त्याने विनयभंग केला. याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक मुगले करीत आहेत.
या तिन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बलात्कार, विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चौथी घटना मेन रोड भागात घडली. पीडिता व तिचा पती शुक्रवारी (दि.१) दिवाळीच्या खरेदीसाठी मेन रोड परिसरातील भगवंतराव मिठाईवाले शेजारील विशाल बाजार या दुकानात गेले होते. पीडित दाम्पत्य खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल अदा करून दुकानाबाहेर पडत असताना ही घटना घडली. संशयित शोएब शरिफ कुरेशी (वय २३, रा. दूध बाजाराजवळ) या परप्रांतीय कामगाराने दाम्पत्यास पुन्हा दुकानात बोलावून घेत, चोरीच्या संशयातून महिलेची पर्स चेक केली, यामुळे झालेल्या वादात संशयिताने दाम्पत्यास बेदम मारहाण करीत भरबाजारात महिलेचा विनयभंग केला. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास हवालदार बागूल करीत आहेत.
पाचवी घटना त्र्यंबक रोडवरील एका हॉटेलमध्ये घडली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडिता तिचा पती, पतीचा मावसभाऊ आणि बहीण शनिवारी (दि. २) रात्री जेवण करण्यासाठी त्र्यंबक रोडवरील बीएलव्हीडी हॉटेल येथे गेले होते. या ठिकाणी एका अनोळखी तरुणाने महिलेस धक्का देत विनयभंग केल्याने ही घटना घडली. हा वाद विकोपाला गेल्याने संतप्त टोळक्याने महिलेच्या पतीसह दिरास शिवागाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक न्हाळदे करीत आहेत.
Web Title: Husband’s elder brother broke into the house and raped the woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study