Home बीड मनोज जरांगे देतील तो उमेदवार मान्य

मनोज जरांगे देतील तो उमेदवार मान्य

Maharashta assembly Election 2024: उमेदवाराच्या पाठीशी सर्वांनी ताकदीने उभा राहण्याचा लेखी ठरावच करण्यात आला.

Manoj Jarange will accept the candidate assembly Election

बीड: ‘मतदारसंघ क्षीरसागरमुक्त करायचा एवढेच ध्येय आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे ज्याला उमेदवारी देतील त्याच्या मागे सर्वजण ताकदीने उभे राहतील, असा एकमुखी लेखी ठराव आज इच्छुकांच्या बैठकीत घेण्यात आला. या ठरावावर साक्षीदार म्हणून दोघांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सुरुवातीला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी लढायचे का पाडायचे हे ठरवू, इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन केले होते. त्यानंतर अंतरवाली सराटीत इच्छुकांच्या मुलाखतीही झाल्या. दरम्यान, बीडमधून जरांगे यांच्याकडून २२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता माघार कोण घेणार, असा प्रश्न असतानाच आज उमेदवारी अर्ज दाखल केलेले सर्व इच्छुक एकत्र आले. आपल्यापैकी कोणी एकाचे नाव पुढे करण्यापेक्षा जरांगे जे नाव देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी सर्वांनी ताकदीने उभा राहण्याचा लेखी ठरावच करण्यात आला. या ठरावावर साक्षीदार म्हणून अॅड. मंगेश पोकळे, ज्ञानदेव काशीद यांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या. हा ठराव जरांगे यांना पाठविण्यात आला. या निवडणुकीत क्षीरसागरमुक्त बीड मतदारसंघ एवढेच ध्येय असल्याचे यावेळी मराठा आरक्षण आंदोलक म्हणाले. बीडमध्ये जरांगे यांच्याकडून डॉ. ज्योती मेटे, बळिराम गवते, बी. बी. जाधव यांच्यासह २२ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

Web Title: Manoj Jarange will accept the candidate assembly Election

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here