धक्कादायक! नातेवाईकाने गुंगीचे औषध दिलं अन् शाळकरी मुलीवर अत्याचार
Breaking News | Pune Crime: गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (sexual abused) करण्यात आला असून नात्यातील एका नराधम तरूणानेच हे कृत्य केल्याचे समोर.
पुणे: पुण्यात एका शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून नात्यातील एका नराधम तरूणानेच हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. शाळेतील तक्रार पेटीतून या भयानक कृत्याचा उलगडा झाला असून त्यामुळे संपूर्ण शाळाच हादरली आहे.
पीडित मुलीच्या आईला या घटनेसंदर्भात समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र त्या नराधमाला शिक्षा मिळालीच पाहिजे, या निर्धाराने त्या मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस स्थानक गाठून तेथे सर्व प्रकार कथन करत फिर्याद दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून 21 वर्षीय तरूणाला अटक केली आहे, धक्कादायक गोष्ट म्हणजे तो तरूण त्या मुलीच्या नात्यातीलच आहे. त्याच्याविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Web Title: relative gave gungi medicine and sexual abused the school girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study