शेजाऱ्याच्या पत्नीवर रात्री घरात घुसून ओढणीने बांधत बलात्कार

    Breaking News | Thane Crime: एकाने शेजाऱ्याच्या घरात घुसून त्याच्या पत्नीला ओढणीने बांधून बलात्कार.

    Neighbor's wife was raped by breaking into the house 

    ठाणे: दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या असून ठाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये एकाने शेजाऱ्याच्या घरात घुसून त्याच्या पत्नीला ओढणीने बांधून बलात्कार केला. या घटनेने खळबळ उडाली असून पीडित महिलेने दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.

    आरोपी रात्री 11च्या सुमारास शेजाऱ्यांच्या घरात बळजबरीने घुसला. त्यावेळी घरात 38 वर्षीय पीडित महिला आणि तिची तीन वर्षांची लहान मुलगी होती. आरोपीने पीडितेचे ओढणीने हात-पाय बांधले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेवर तिच्या लहान मुलीसमोरच आरोपीने अत्याचार केला. आरोपीने तिच्यावर हल्लाही केल्याची माहिती भाईंदर पोलिसांनी दिली आहे. महिलेने दुसऱ्या दिवशी पोलिसात धाव घेतली आणि आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला गेला असून पोलिसांनी अटक केल्याची माहिती समजत आहे. भारतीय न्याय संहितेनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

    Web Title: Neighbor’s wife was raped by breaking into the house 

    See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here