अहमदनगर जिल्ह्यात पाच व्यक्तींना करोनाची लागण
अहमदनगर: जिल्ह्यात आज आणखी पाच करोनाबाधित व्यक्तींचा समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील जिल्ह्यात अशा एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ९९ झाली आहे.
दरम्यान परराज्यातून येणाऱ्या नागरिकांनी स्वतःला विलगीकरण करून घ्यावे तसेच ज्या जेष्ठ नागरिकांना मधुमेह व इतर आजार आहेत त्यांनी सर्दी खोकला व इतर आजार असल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील करोना टेस्ट लॅब मध्ये ५४ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या पाच व्यक्ती आढळून आल्या आहेत.
यात घाटकोपर येथून टाकळीमिया राहुरी येथे आलेली ३५ वर्षीय महिला, भिवंडी येथून नगर शहरातील दातरंगे मळा येथे आलेल्या ६० वर्षीय व्यक्ती, ठाणे येथून पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडे येथे आलेला ४६ वर्षीय व्यक्ती, घाटकोपर येथून पिंपळगाव अकोले येथे आलेली ६६ वर्षीय महिला आणि राहता तालुक्यातील शिर्डी जवळील निमगाव जवळील ५५ वर्षीय महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
११ व्यक्तींचे रिपीट अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर सध्या ३३ जण उपचार घेत आहेत. तीन जण नाशिक येथे उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली आहे.
Website Title: Coronavirus Five people infected in Ahmednagar