Home पुणे गणपती विसर्जनाच्या दिवशीच रक्तपात! दोन खुन

गणपती विसर्जनाच्या दिवशीच रक्तपात! दोन खुन

Breaking News | Pune Crime: गणपती विसर्जनाची धामधुम असताना पुण्यामध्ये दोन खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर.

Bloodshed on the day of Ganpati immersion Two murders

Latest Pune News: संपूर्ण राज्यात गणपती विसर्जनाची धामधुम असताना पुण्यामध्ये दोन खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जनाच्या दिवशी पुण्यामध्ये दोन खून झाले आहेत. यातला एक खून विश्रांतवाडी येथे झाला आहे तर दुसरा खून बालेवाडी परिसरामध्ये झाला आहे. यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे

पहिली घटना पुण्यातल्या विश्रांतवाडीमध्ये महिलेवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. प्रेम प्रकरणातून या महिलेच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. जखमी महीलेला लगेचच पोलिसांनी ससून रुग्णलयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

तर दुसरी घटना पुण्याच्या बावधन परिसरात घडली आहे. बावधन परिसरात कामगाराची हत्या करण्यात आली. तुषार बालवडकर यांच्या जागेत ग्रीन ड्रीम नर्सरी बावधन या ठिकाणी या कामगाराची हत्या करण्यात आली. प्रवीण कुमार भोला महतू (२६ वर्षे) असं या तरुणाचे नाव आहे.

Web Title: Bloodshed on the day of Ganpati immersion Two murders

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here