Home कोल्हापूर चाकूने भोसकून तरूणाची हत्या; आरपार घुसलेला चाकू पोटातच तुटून पडला

चाकूने भोसकून तरूणाची हत्या; आरपार घुसलेला चाकू पोटातच तुटून पडला

Breaking News | Kolhapur Crime: चाकू आरपार पोटात घुसल्याने चाकू सुद्धा पोटात तुटून पडला.

young man was killed by a knife

कोल्हापूर : कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथे हातगाडी लावण्याच्या कारणावरून इम्रान मुजावर आणि युसूफ अलमजीद या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून युसूफ अलमजीद याने चाकूने भोसकून इम्रान मुजावरचा खून केला. हातगाडी लावण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती दिली जात आहे. जुना राजवाडा पोलिसांनी संशयित युसूफ याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  कोल्हापूरातील आराम कॉर्नर येथे हातगाडीचालकांमध्ये मारामारी झाली होती. हा वाद स्थानिकांनी मिटवला होता. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास अलमजीद याने तुला पैसे द्यायचे आहेत, असे सांगून इम्रान मुजावर याला आराम चौकात बोलावून घेतले. याचवेळी बेसावध असलेल्या मुजावर याच्या पोटात अलमजीद याने चाकूने पोटात वार केला. हा चाकू आरपार पोटात घुसल्याने चाकू सुद्धा पोटात तुटून पडला होता.

दरम्यान, गंभीर घाव बसल्याने यामध्ये तो जागीच मृत्युमुखी पडला. चाकूने भोसकून इम्रान मुजावर मयत झाल्याचे समजताच सीपीआर आवारात नातेवाईकांची गर्दी झाली होती. संशयित आरोपी युसुफ अलमसजीत (दाजी) राजवाडा पोलीसांच्या ताब्यात घेतले. ऐन गणेश विसर्जन मिरवणुक सुरु असताना खूनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: young man was killed by a knife

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here