Home कोल्हापूर धक्कादायक! ९ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

धक्कादायक! ९ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

Breaking News | Kolhapur Crime: खासगी क्लासमध्ये शिकत असणा-या नऊवर्षीय चिमुकलीवर ७३ वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

Abuse of 9 year old child

कोल्हापूर : बदलापूर अन् कोलकाता येथील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच कोल्हापुरात देखील एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. राधानगरी येथील खासगी क्लासमध्ये शिकत असणा-या नऊवर्षीय चिमुकलीवर ७३ वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे कोल्हापूर हादरून गेले असून, राज्यात महिला आणि चिमुकलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अधिक माहिती अशी की, राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या खासगी क्लासमध्ये ७३ वर्षीय श्रीपती भोसले याआरोपींने पिडीतेला क्लासमध्ये बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो कायदा अंतर्गत श्रीपती भोसले या ७३ वर्षीय नराधमावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, राधानगरी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यात लैंगीक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आता कोल्हापूरमधील मधील या घटनेमुळे चांगलीच खळबळ माजली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Web Title: Abuse of 9 year old child

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here