Home पुणे माजी नगरसेवकाच्या पिस्तुलातून हॉटेलमध्ये झाडली गोळी

माजी नगरसेवकाच्या पिस्तुलातून हॉटेलमध्ये झाडली गोळी

Breaking News | Pune Crime: राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या रिव्हॉल्व्हरमधून सराईत गुन्हेगाराने टेबलवर गोळीबार केल्याची घटना.

bullet fired in the hotel from the pistol of the former corporator

पिंपरी | पुणे: हॉटेलमध्ये बसलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या रिव्हॉल्व्हरमधून सराईत गुन्हेगाराने टेबलवर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास काळेवाडीत राहुल बार ॲण्ड खुशबू या हॉटेलमध्ये घडली.

याप्रकरणी सचिन दत्तू नढे (रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) याला अटक करण्यात आली आहे, तर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते (अजित पवार गट) विनोद जयवंत नढे यांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. हॉटेलचे व्यवस्थापक तुषार लक्ष्मीचंद भोजवानी (वय २४, रा. पाचपीर चौक, पंचनाथ कॉलनी, काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन, विनोद, तुकाराम नढे, माउली नढे हे हॉटेलमध्ये पहिल्या मजल्यावर बसले होते. भोजवानी यांना रात्री पावणेनऊच्या सुमारास फटाक्यासारखा मोठा आवाज आला. त्यांनी वर जाऊन पाहिले असता सचिन याच्या हातामध्ये पिस्तूल होते. त्याने पिस्तुलाने जेवणाचे ताट ठेवण्याच्या पत्र्याच्या टेबलवर गोळी झाडली. बाजूला गोळीची एक पुंगळी पडली होती. गोळीबार झाल्यानंतर हॉटेलमधील ग्राहक घाबरून पळून गेले. स्वतःच्या सुरक्षेसाठी विनोद नढे हे पिस्तूल वापरतात. हॉटेलात बसलेले असताना सचिन याने विनोद यांचे पिस्तूल हातात घेतले आणि लोड करून थेट गोळी झाडली, असे पोलिस तपासातून पुढे आले.

Web Title: bullet fired in the hotel from the pistol of the former corporator

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here