तरुणी घरात एकटी असताना विनयभंग; एकावर गुन्हा दाखल
Breaking News | Ahmednagar: एका वीस वर्षीय तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून सकाळच्या दरम्यान तरुणाने तिच्या घरात घुसून तिचा हात धरुन विनयभंग केल्याची घटना.
राहुरी: तालुक्यात एका वीस वर्षीय तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून सकाळच्या दरम्यान तरुणाने तिच्या घरात घुसून तिचा हात धरुन विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत अक्षय बर्डे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका वीस वर्षीय तरुणीचा आरोपी अक्षय बर्डे हा नेहमी पाठलाग करीत असे. सकाळी ८ वाजेदरम्यान ही तरुणी तिच्या घरात एकटीच होती. याचा फायदा घेऊन आरोपी अक्षय बर्डे हा पिडीत तरुणीच्या घरात घुसला. त्याने पिडीत तरुणीचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय नामदेव बर्डे (रा. शेरी चिखलठाण, ता. राहुरी) याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम ७५, ७८, ३५१ (२) (३) प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामनाथ सानप हे करीत आहे.
Web Title: Molestation of a young woman when she is alone at home
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study