Home पुणे इंजिनिअर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार, चौघांवर गुन्हा

इंजिनिअर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार, चौघांवर गुन्हा

Breaking News | Pimpri Crime: सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार.

Sexual assault on woman engineer, crime against four

पिंपरी : सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले, तसेच त्याने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगून त्याचे अश्लील चित्रीकरण केले. पुनावळे येथे सप्टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत ही घटना घडली.

पीडित महिला आणि तिचा पती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तिच्या पतीने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सांगितले, तसेच या अत्याचाराची अश्लील चित्रफीत तयार केली.  ती चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्यही केले. यास विरोध केला असता तिला शिवीगाळ केली.

याबाबत ३० वर्षीय महिलेने बुधवारी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी पीडित महिलेच्या पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

Web Title: Sexual assault on woman engineer, crime against four

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here