धक्काद्यक! शाळकरी मुलगी गर्भवती
Breaking News | Amravati Crime: लैंगिक अत्याचारातून 12 वर्षांची शाळकरी मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर.
अमरावती: गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच लैंगिक अत्याचारातून 12 वर्षांची शाळकरी मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना चांदूरबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 10) उघडकीस आली.
पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दिलेल्या तक्रारीनुसार, तिची 12 वर्षांची मुलगी शालेय शिक्षण घेत आहे. दरम्यान, आरोपी आकाशने तिला आमिष दाखवून त्याच्या घरी नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तिने विरोध केला असता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेची प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने तिला रुग्णालयात नेले. तिथे तिची तपासणी केली असता ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी आकाश अरुण पारिसे (25) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पीडिता ही एक महिना 3 दिवसांची गर्भवती आहे. याबाबत चांदूरबाजार पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून आरोपीविरोधात लैंगिक अत्याचारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Web Title: School girl pregnant
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study