Home नाशिक अश्लिल व्हिडिओ व्हायरलची धमकी देत घटस्फोटीत पत्नीवर अत्याचार

अश्लिल व्हिडिओ व्हायरलची धमकी देत घटस्फोटीत पत्नीवर अत्याचार

Breaking News | Nashik Crime: पत्नीला घटस्फोट देऊन लग्नाचे आमिष दाखवून एका युवकाने पीडितेवर अत्याचार केल्याची घटना.

Divorced wife assaulted by threat of obscene video going viral

नाशिक: पत्नीला घटस्फोट देऊन लग्नाचे आमिष दाखवून एका युवकाने पीडितेवर अत्याचार केला. तसेच शेअर्समध्ये आर्थिक गुंतवणूक करून सुमारे १२ लाखांची फसवणूक करीत, पीडितेचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी संशयित अजयकुमार नंदकुमार चिंचोळकर (रा. शालिमार) याच्याविरोधात इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०२२ मध्ये पीडितेशी पीएफचे हप्ते भरण्यावरून ओळख झाली. त्यानंतर संशयिताने पत्नीला घरस्फोट देऊन लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर एका गेस्ट हाऊसवर नेत शारीरिक संबंध केले. तसेच, शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून ११ लाख ९० हजारांची फसवणूक केली. अश्लिल व्हिडीओ असून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.

चौरंग व पाट विकत घेतल्यानंतर राहिलेले पैसे न दिल्याने संशयित विक्रेत्याने विवाहितेच्या पतीच्या व्हॉटसपवर पीडितेचे फोटो व त्याखाली अश्लिल संदेश पाठवून विनयभंग केला. लक्ष्मण असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Divorced wife assaulted by threat of obscene video going viral

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here