Home नाशिक ऐन गणेशोत्सवात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

ऐन गणेशोत्सवात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

Breaking News | Nashik Crime: पुन्हा एकदा नाशिक खुनाच्या घटनेने हादरले, ऐन गणेशोत्सवात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या.

young man was killed by a stone on his head during Ganeshotsav

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा नाशिक खुनाच्या घटनेने हादरले आहे. पंचवटी कारंजा परिसरात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळातच खुनाची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, अतुल सूर्यवंशी या तरुणाची पंचवटी कारंजा परिसरात काल रात्रीच्या सुमारास डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. पूर्व वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या काळातच खुनाची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एका संशयितास ताब्यात घेतले आहे. तर इतर संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला आहे. या घटनेमुळे पंचवटी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचवटी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: young man was killed by a stone on his head during Ganeshotsav

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here