Home जळगाव लहान बहिणीसमोरच पीडितेवर बलात्कार करून हत्या  

लहान बहिणीसमोरच पीडितेवर बलात्कार करून हत्या  

Jalgaon Crime News: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर.

victim was raped and killed in front of her younger sister

जळगाव:  कोलकाता आणि बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. जळगावातही एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने जळगावात एकच खळबळ उडाली आहे.

गणपती स्थापनेच्या दिवशीच चोपडा तालुक्यातील एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नराधमाने सुरुवातीला तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनीही पाशवी अत्याचार व खून करुन पळून जाणाऱ्या नराधमाला ताब्यात घेतलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही शेतात कामासाठी गेली होती. संध्याकाळी शेतातून काम करुन घरी येत असताना नराधमाने बळजबरीने तिला ओढून शेतात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर कोणालाही कळू नये यासाठी तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, पीडीत मुलीच्या लहान बहिणीसमोर हा सगळा प्रकार घडला होता. त्यानंतर लहान बहिणीने गावात जाऊन सगळ्यांना घडलेली हकिकत सांगितली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: victim was raped and killed in front of her younger sister

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here