आयुष्यभर सांभाळण्याचे आमिष दाखवून अत्याचार
Breaking News | Crime: महिला आणि मुलांना आयुष्यभर सांभाळण्याचे आमीष दाखवून अत्याचार केल्याची घटना.
छत्रपती संभाजीनगर : महिला आणि मुलांना आयुष्यभर सांभाळण्याचे आमीष दाखवून अत्याचार केल्याची घटना चौधरी कॉलनी चिकलठाणा येथे घडली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरजीत धर्मराज मुजमुले (रा. जय भवानीनगर गल्ली नंबर १२) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सन २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आरोपीने फिर्यादीला आणि मुलांना आयुष्यभर सांभाळण्याचे आमीष दाखवत वारंवार अत्याचार केला. चिकलठाणा येथील चौधरी कॉलनी तसेच मुकुंदवाडी परिसरातील महालक्ष्मी चौक परिसरात नेत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फसविले गेल्याचे लक्षात येताच महिलेने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
Web Title: Abused with the lure of maintaining for life
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study