अहमदनगर: पहाटे पायी जाणाऱ्या महिलेसोबत घडली धक्कादायक घटना
Breaking News | Ahmednagar: पायी प्रवास करत असलेल्या महिलेला शुक्रवारी पहाटे अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने या महिलेचा जागीच मृत्यू.
पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील करंजी गावाजवळील कान्होबावाडी फाटा येथे देवराई कडून करंजीकडे पायी प्रवास करत असलेल्या महिलेला शुक्रवारी पहाटे अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कमल अशोक लंबे (रा. बगडी ता-गंगापूर जि-छत्रपती संभाजीनगर) अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव असून अपघात घडल्यानंतर करंजी पोलीस औट पोस्टचे सहाय्यक फौजदार हरिभाऊ दळवी,भगवान टकले यांनी घटनास्थळी जाऊन या महिलेचा मृतदेह पाथर्डी येथे शवविच्छेदनासाठी रवाना केला.
या महिलेसोबत इतर कोणीही नसल्यामुळे या महिलेची शुक्रवारी सायंकाळी ओळख पटली. त्यानंतर साकेगाव तालुका पाथर्डी येथील या महिलेच्या नातेवाईकांनी बगडी तालुका गंगापूर या ठिकाणी महिलेच्या कुटुंबांना कळवले व त्यानंतर या महिलेचा मृतदेह कुटुंबियाकडे स्वाधीन करण्यात आला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार हरिभाऊ दळवी, भगवान टकले करत आहेत.
Web Title: Accident incident happened with a woman who was walking in the morning
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study