अहमदनगर: रिक्षाचालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
Breaking News | Ahmednagar: क्लासला चाललेल्या विद्यार्थिनीची (वय १६) रिक्षाचालकाने रिक्षातून पाठलाग करत तिची छेड काढल्याची घटना.
अहमदनगर: क्लासला चाललेल्या विद्यार्थिनीची (वय १६) रिक्षाचालकाने रिक्षातून पाठलाग करत तिची छेड काढल्याची घटना भिंगार उपनगरात शुक्रवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी त्या रिक्षा चालकाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश प्रवीण सरोदे (वय १९, रा. माळगल्ली, भिंगार) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडिताने फिर्याद दिली आहे. फिर्यादी शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडली. ती रस्त्याने पायी जात असताना यश सरोदे याने तिचा रिक्षातून (एमएच १६ बीसी ०५२२) पाठलाग केला. तिला एका ठिकाणी अडवून तिचा हात पकडत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व तिची छेड काढली. तसेच यश सरोदे याने पूर्वीही फिर्यादी मुलीचा दोन वेळा पाठलाग करत ‘चल तुला रिक्षातून सोडतो’ असे म्हणत तिची छेड काढली होती. त्याच्याकडून वारंवार होत असलेल्या त्रासामुळे पीडिताने सदर प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर कुटुंबियांसमवेत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी यश सरोदे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Web Title: Student molested by rickshaw puller
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study