अहमदनगर: प्रवरा नदीपात्रात उडी मारून तरुणीची आत्महत्या
Breaking News | Ahmednagar: २२ वर्षीय तरुणीने प्रवरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली.
नेवासा : नेवासा बुद्रुक येथील एका २२ वर्षीय मुलीने रविवारी (दि. २५) प्रवरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे. ही मुलगी अद्याप सापडली नाही. याबाबत मुलीच्या वडिलांनी नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीत म्हटले की, नेवासा बुद्रुक येथून २२ वर्षीय माझी मुलगी रविवारपासून बेपत्ता झाली आहे.
नेवाशातील प्रवरा नदीजवळ खेळणाऱ्या काही मुलांनी या मुलीने नदीपात्रात उडी मारल्याचे पाहिले असल्याचे खबरीत म्हटले आहे. त्यानुसार नेवासा पोलिस निरीक्षक धनंजय जाधव तहसीलदारांच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाद्वारे नदीपात्राच्या प्रवाहात शोध घेण्याचे कार्य करीत आहेत. त्या मुलीचा मृतदेह नेवासा मध्यमेश्वर बंधाऱ्याजवळील माकोटा परिसरात रात्री ८च्या दरम्यान सापडला.
Web Title: Young woman committed suicide by jumping into Pravara riverbed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study