अजित पवारांना दे धक्का; हे माजी आमदार तुतारी फुंकणार
Breaking News | Pune Politics: अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.
पुणे : लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चागलं यश मिळालं. त्यामुळे, त्यांच्या पक्षाकडे उमेदवारांचा कल वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील काही नेतेही शरद पवरांकडून उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची भेट घेणाऱ्यांची संख्या वाढली असून माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आणि भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांनीदेखील शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर, आता विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी मोठी घोषणा केली आहे. विलास लांडे विधानसभेला तुतारी फुंकणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
शरद पवारांची भेट घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची सध्या रांग लागली आहे. त्यात, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या गटात आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच, अजित पवारांच्या पक्षातून संधी मिळणार नसल्याचे लक्षात येत विलास लांडे यांनी शरद पवारांकडून तुतारी फुंकण्याची तयारी दर्शवली आहे. आता, त्यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी याबाबत घोषणाच केलीय.
अजित पवार गटाचे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे तुतारी फुंकणार असल्याचं त्यांचे पुत्र विक्रांत लांडेंनी अखेर जाहीर केलं. आजच्या शरद पवारांच्या भेटीनंतर विक्रांत लांडेंनी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळं अजित पवारांना बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार पुन्हा एक धक्का देणार, हे स्पष्ट झालंय. याने अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.
Web Title: Ajit Pawar This former MLA will blow the trumpet
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study