दोघांनी मुलीला हॉटेलमध्ये नेलं, एकाने लैंगिक अत्याचार केला तर दुसऱ्याने वाहिनी म्हणून विनयभंग
Breaking News | Pune Crime: एका 31 वर्षीय व्यक्तीने 16 वर्षीय मुलीवर हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार (rape) केल्याची घटना समोर आली आहे.
पुणे: पुणे येथे गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले असून अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. पुण्यातील हडपसर परिसरामध्ये दोन अल्पवयीन मुलीवर दोन वेगवेगळ्या अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत 42 वर्षीय आरोपीने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत मारहाण केली आहे. दुसऱ्या घटनेमध्ये एका 31 वर्षीय व्यक्तीने 16 वर्षीय मुलीवर हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला आहे. सदर घटनांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या घटनेमध्ये, 14 वर्षे मुलगी आपल्या आई-वडिलांसह हडपसर परिसरातील एका पुनर्वसन केलेल्या शासकीय वसाहतीमध्ये राहायला आहे. 42 वर्षीय आरोपीने मुलीच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरामध्ये प्रवेश करून मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर दोन वर्षापूर्वी सुद्धा लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेतून पीडिता सावरत नाही पुन्हा तिच्यावर 42 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला आहे.
दुसऱ्या घटनेत, अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचं समोर आलंय. आरोपीने धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी 31 वर्षीय आरोपी आणि त्याचा दुसरा नातेवाईक या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींनी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला लोणी काळभोर येथील एका हॉटेल मध्ये नेले.
31 वर्ष आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला तर त्याचा दुसरा नातेवाईक याने अल्पवयीन तरुणीला आरोपी सोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच, वहिनी म्हणून तिचा विनयभंग केला. या दोन्ही घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडल्या असून या दोन्ही आरोपी विरोधात हडपसर पोलीस स्थानकात अॅट्रॉसिटी सह लैंगिक अत्याचार आणि इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
Web Title: Both took the girl to a hotel, one sexually assaulted her while the other molested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study