Home अहमदनगर स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात तरुण ठार; एक गंभीर जखमी

स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात तरुण ठार; एक गंभीर जखमी

Breaking News | Ahmednagar: शिवारात स्कॉर्पिओ कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला आदळून उलटल्याने या अपघातामध्ये युवकाचा जागीच मृत्यू.

young man was killed in a terrible accident involving a Scorpio car

पारनेर: नगर-कल्याण महामार्गावर धोत्रे बुद्रुक शिवारात स्कॉर्पिओ कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला आदळून उलटल्याने या अपघातामध्ये रोहित काकडे (वय २३ रा. डिकसळ ता. पारनेर) या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे.

रविवारी (दि. २९) रोजी सायंकाळी पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक शिवारातील ढोरमूख येथे टाकळीढोकेश्वरकडून भाळवणीकडे जात असलेल्या भरधाव स्कॉर्पिओ कार क्रमांक जीजे ०१ केएम ९२७२ वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पुलाच्या संरक्षक कठड्याला आदळून उलटल्याने या अपघातात रोहित काकडे या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच टाकळीढोकेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व जखमी युवकाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

Web Title: young man was killed in a terrible accident involving a Scorpio car

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here