भंडारदरा ९० टक्के तर निळवंडे ५० टक्के, नदीत विसर्ग सोडण्याची शक्यता
Breaking News | Bhandardara: भंडारदरा धरणात नव्याने पाण्याची आवक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून धरणातून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज बुधवारी कोणत्याही क्षणी प्रवरा नदीत विसर्ग सोडण्याची शक्यता.
भंडारदरा: पाणलोटात पुन्हा एकदा आषाढ सरींनी तांडव नृत्य सुरू केल्याने भंडारदरा धरणात नव्याने पाण्याची आवक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून धरणातून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज बुधवारी कोणत्याही क्षणी प्रवरा नदीत विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास निळवंडेतीलही पाणीसाठा वेगाने वाढणार आहे.
चार-पाच दिवसांपूर्वी पाणलोटातील पाऊस कमी झाल्याने धरणात येणारी पाण्याची आवक कमी झाली होती. पण सोमवारी रात्रीपासून पाणलोटात आषाढसरींनी फेरा वाढविला. मंगळवारी तर सकाळपासून या आषाढसरींनी तांडव करण्यास सुरूवात केली. त्यामुळे धरणात आवक वाढली. मंगळवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 326 दलघफू पाणी जमा झाले. त्यापैकी वीज निर्मितीसाठी 70 दलघफू पाणी वापरले गेले.साठ्यात 326 दलघफू पाणी जमा झाले. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात 9638 दलघफू (87.31 टक्के) झाला होता. रे, रतनवाडीत आषाढ सरी जोरदार कोसळत असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक होत आहे.
काल दिवसभरात बारा तासांत 293 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यापैकी 35 दलघफू पाणी वापरले गेले. तर 258 दलघफू पाणी जमा झाले. परिणामी सायंकाळी धरणातील पाणीसाठा 9896 दलघफू(89.65टक्के) झाला होता. वाढलेला पाऊस आणि होणारी आवक यामुळे जलसंपदा विभागाने हालचाली सुरू केल्या ओहत. अभियंता आणि त्यांचे सहकारी पाणी साठ्यावर करडी नजर ठेवून आहेत. 10400 अथवा 10500 दलघफू पाणीसाठा झाल्यानंतर पाण्याची पाणी नियंत्रणासाठी प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
भंडारदरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने निळवंडे धरणातही पाण्याची जोरदार आवक होत आहे. 8330 दलघफू क्षमतेच्या निळवंडेत काल मंगळवारी सकाळी 4140 दलघफू (49.76टक्के) पाणी होते. त्यानंतर आवक सुरूच असल्याने 98 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यामुळे सायंकाळी या धरणातील पाणीसाठा4238 दलघफू (50.89टक्के) झाला होता.रात्री हा पाणीसाठा 51 टक्क्यांच्या पुढे गेला होता. भंडारदरात पाऊस सुरू असल्याने आज बुधवारी या धरणातील पाणीसाठा 55 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.
सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पाणलोटात पावसाचा जोर काहिसा वाढल्याने मुळा धरणात आवक वाढु लागली आहे. काल मंगळवारी सकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग 4024 क्युसेक होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने दुपारी 3 वाजता हा विसर्ग 4227 क्युसेकपर्यंत वाढला. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता हा विसर्ग 5990 क्युसेकपर्यंत वाढला होता. तर 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा 16228 दलघफू झाला होता. हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित भागात पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आज आवक वाढण्याची शक्यता आहे.
Web Title: Bhandardara 90 percent and Nilwande 50 percent, possibility of discharge
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study