मुख्याध्यापक, तुम्हीसुद्धा ? टक्केवारीने मागितली लाच
Breaking News | Beed Crime: सहशिक्षकाकडूनच मागितले २,७०० रुपयांची लाच.
बीड : वरिष्ठ श्रेणीचे बिल तयार करून ते बिल गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गेवराई व जिल्हा परिषद बीड येथून मंजूर करून देण्यासाठी एकूण बिलापैकी १० टक्के याप्रमाणे २,७०० रुपयांची लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी केली. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती. भारत शेषेराव येडे (वय ५७, रा. गेवराई) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते गेवराई तालुक्यातील
मण्यारवाडी शाळेत कार्यरत आहेत. तक्रारदार हे याच तालुक्यातील आहेर वाहेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचे लाभ अटी व शर्तीनुसार मान्य केले आहेत. संबंधित मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांनी वरिष्ठ श्रेणी देय आहे किंवा कसे असे पत्र काढले होते. त्यावरून तक्रारदार यांचे वरिष्ठ श्रेणीचे बिल तयार करून ते बिल गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गेवराई व जिल्हा परिषद बीड येथून मंजूर करून देण्यासाठी एकूण बिलाची रक्कम २७ हजार रुपयांच्या १० टक्केप्रमाणे २७०० रुपयांची लाच मागितली होती.
Web Title: Principal, you too A percentage of the bribe demanded
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study