संगमनेर: सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू
Breaking News | Sangamner: सामाजीक कार्यकर्ते तसेच सर्पमित्र असणारे पिरमहमद कासम शेख यांचे संर्पदंशाने निधन.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील शिबलापुर येथील सामाजीक कार्यकर्ते तसेच सर्पमित्र असणारे पिरमहमद कासम शेख यांचे संर्पदंशाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५५ वर्ष होते.
कै. पिरमहमंद सय्यद हे मनमिळावू स्वभावाचे होते गेल्या २० वर्षापासून तालुक्याच्या पुर्व भागाकडील आश्वी, साकूर व परिसरातील गावांमध्ये संर्पमित्र म्हणून परिचित होते. कुठल्याही प्रकारचे लाभ न घेता निःस्वार्थीपणे सामाजिक दायित्वातून संर्प पकडण्याचे काम करत. आतापर्यंत अनेक प्रकारच्या जातीचे संर्प पकडून त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडण्याचे काम त्यांनी केले. नुकत्याचं डिग्रस येथे एका घरातून त्यांनी विषारी सर्प पकडला होता. त्याला जंगलात सोडत असताना तो विषारी सर्प हातातून निसटल्याने त्या सपनि त्यांच्या हाताला दंश केला. त्यावेळी त्यांच्या कुटुंबांने त्यांना त्वरीत दवाखान्यात नेले. मात्र उपचार सुरु असताना पिरमहमंद सय्यद यांचा मृत्यु झाला यापुर्वी त्यांना बहुतांश वेळा सर्पाने दंश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सावधगिरीमुळे ते वाचले होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा मोठा परिवार असुन शिबलापुर येथील हॉटेल शालीमारचे मालक सामाजिक कार्यकर्ते सत्तारभाई शेख यांचे ते मोठे बंधु होते.
Web Title: Death of Sarpamitra by snakebite
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study