Home नाशिक पुलाचा कठडा तोडून कार थेट नदीत कोसळली, एक ठार

पुलाचा कठडा तोडून कार थेट नदीत कोसळली, एक ठार

Breaking News | Nashik Accident: गोदावरी नदीच्या पुलाजवळ एक भीषण अपघाताची घटना घडली. एका तरुणाचा मृत्यू झाला.

car broke off the embankment of the bridge and plunged directly into the river, killing one

नाशिक: नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुलाजवळ एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील गोदावरी नदीच्या पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. हॉटेल गंमत जंमत परिसरात ही अपघाताची घटना घडली आहे. रात्रीच्या अंधारात कार थेट गोदावरी नदीत कोसळली आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चकनाचुर झाला आहे. कारच्या काचादेखील फुटल्या आहेत.

अपघातात नितीन कापडणीस या तरुणाचा मृत्यू झाला आहे तर तर अपघातात किरण कदम, योगेश पानसरे हे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.  कार पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली आहे. रात्रीवेळीस ही घटना घडली आहे.   नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसातील हा तिसरा अपघात आहे. अपघातात जखमी तरुणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नितीन बापू कापडणीस (३५, रा. चांदशी) असे मृत कारचालकाचे नाव आहे. तर, किरण संजय कदम (३२), योगेश पानसरे (३४, दोघे रा. चांदशी) अशी कारमधील जखमींची नावे आहेत. शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नितीन कापडणीस हा त्याच्या कारमधून किरण व योगेश या दोघा मित्रांसमवेत दुगावकडून गंगापूर गावाच्या दिशेने येत होता. दुगावकडून गंगापूरकडे येताना हॉटेल गंमत-जंमतच्या अलिकडे गोदावरी नदीवर पुल आहे. तसेच पुलाकडे येताना उतारही आहे.

या उतारावरून कापडणीस यांची कार भरधाव वेगात येत असतानाच समोरून आलेल्या वाहनाच्या अप्पर डिप्परचा प्रखर लाईट कापडणीस याच्या डोळ्यावर आला. त्यामुळे काही क्षणात कापडणीस यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार काही कळायच्या पुलाचा कथडा तोडून नदीपात्रामध्ये पलटी झाली. नदीला ) पाणी नसल्याने कार खडकावर जाऊन आदळली. त्यात कापडणीस यांस गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. तर कारमधील दोघे किरण व योगेश हे जखमी झाले.

Web Title: car broke off the embankment of the bridge and plunged directly into the river, killing one

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here