अहमदनगर: माझे तुझ्यावर प्रेम आहे भाजीविक्रेत्याने महिलेचा विनयभंग
Breaking News | Ahmednagar: माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत भाजीविक्रेत्याने महिलेचा विनयभंग केला. तर, आरोपी हॉटेलवर दगडफेक.
नेवासा : माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत भाजीविक्रेत्याने महिलेचा विनयभंग केला. तर, आरोपीने हॉटेलवर दगडफेक केली. ही घटना शहरात शनिवारी दुपारी घडली.
याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अजिज ऊर्फ कालू शेख (रा. गंगानगर, नेवासा खुर्द) अन्य सहा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पीडितेने फिर्यादीत म्हटले, काल दुपारी दोन वाजता आरोपी अजिज शेख याने माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. वडील व त्यांच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आई व बहिणीला जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. चौक येथील हॉटेलवर दगडफेक केली.
Web Title: I love you Vegetable seller molested woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study