Breaking News | Sangamner: संगमनेर शहरातील प्रकार । अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल.
संगमनेर: शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोष्टी गल्लीतील ज्येष्ठ नागरिक अंत्यविधीसाठी बाहेर गावी गेले होते. याच संधीचा फायदा उठवून भरदिवसा त्यांचे घर फोडून तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवल्याचा प्रकार शुक्रवार दि. ३ मे रोजी सकाळी उघडकीस आला आहे. यावरुन आता चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिल्याचे स्पष्ट होत आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, कोष्टी गल्लीतील सतीष मुरलीधर गोडसे गुरुवारी आपल्या पत्नीसह पुणे येथे सख्ख्या भावाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. याच दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या घराशेजारील मोहन मंडलिक यांनी त्यांना फोन करुन तुमच्या घराचे कुलूप अज्ञाताने तोडले असून आपण बाहेरुन दाराला कडी लावली असल्याची माहिती दिली. त्यावर भावाचे सर्व विधी पूर्ण करुन शुक्रवारी येणार असल्याचे सांगून कुलूप लावण्याची विनंती केली. दरम्यान, ते संगमनेरात आले असता त्यांना घरातील सामानाची उचकापाचक झाली असल्याचे दिसले. यावेळी त्यांनीलाकडी कपाटात ठेवलेले दागिने पाहिले असता मिळून आले नाही. त्यात ११ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, तीन ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, तीन ग्रॅमचे दोन सोन्याचे झुबे, बारा ग्रॅमचे सोन्याचे मिनीगंठण असे एकूण २ तोळे ९ ग्रॅम वजनाचे दागिने
चोरट्याने लांबवले आहे. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. याप्रकरणी सतीष गोडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: A house near Sangamner police station was broken into
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study