संगमनेर तालुक्यात सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
Breaking News | Sangamner: सर्विस रोडलगत दत्त मंदिर समोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Dead Body) सापडला.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज सकाळी सात वाजता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग ५० लगत वरुडी फाटा ते साकुर फाटा जाणारे सर्विस रोडलगत दत्त मंदिर समोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.
सदर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती गुंजाळवाडी पठार येथील पोलीस पाटील शिवप्रसाद बाबाजी दिवेकर यांनी घारगाव पोलीस स्टेशनला दिली आहे. सदर व्यक्तीचे वय ३५ वर्षे आहे. ती व्यक्ती रंगाने गोरी, चेहरा गोल, बांधा माध्यम, केस काळे पांढरे, अंगात निळ्या रंगाचा फुल शर्ट, पायात बूट, सदर मृतदेह पुरुष जातीचा असून मृतदेह विषय कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी घारगाव येथे संपर्क करावा. असे आवाहन घारगाव पोलीस निरीक्षक संतोष खेडेकर यांनी केले आहे.
Web Title: Dead body of an unknown person was found in Sangamner taluka
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study