Home महाराष्ट्र धक्कादायक! गुप्तांगात मिरची टाकून मारहाण, चार दिवस डांबून ठेवलं

धक्कादायक! गुप्तांगात मिरची टाकून मारहाण, चार दिवस डांबून ठेवलं

Breaking News | Latur Crime : अमानुष मारहाण, मजुराच्या गुप्तांगात मिरचीची पूड टाकून पुन्हा मारहाण.

beaten with chili pepper in his private parts and kept in captivity for four days

लातूर: जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, गुप्तांगात मिरची टाकून एका मजुरास बेदम मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एवढ्या गंभीर प्रकरणात देखील पोलिसांकडून कोणतेही कारवाई करण्यात येत नव्हती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आणि भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लिफ्ट फिटिंग आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला लातूर येथील डॉक्टर प्रमोद घुगे यांनी संपूर्ण शरीर काळनिळ होईपर्यंत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढ्यावर अमानुष मारहाण थांबली नाही, तर या मजुराच्या गुप्तांगात मिरचीची पूड टाकून पुन्हा महाराण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे 24 मार्च ते 28 मार्चपर्यंत पाच दिवस सतत दिवस-रात्र मारहाण करण्यात आली. तसेच याबाबत कुणालही काहीही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर आल्यावर पोलीस जागे झाले आणि गुन्हा दाखल केल्याचा देखील आरोप होत आहे.

मारहाण करण्यात आलेला मजूर लिफ्ट फिटिंग आणि दुरुस्तीचे काम करतो. दरम्यान, 2021 मध्ये त्याने लिफ्टच्या व्यवहारात काम नीट केलं नसल्याने आपल्याला 1 कोटींचे नुकसान झाल्याचे म्हणत या मजुराला लातूर येथे काम सुरू असताना उचलून नेण्यात आलं. तसेच 24 ते 28 मार्चपर्यंत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्याच्या गुप्तांगात मिरची टाकली. तसेच 50 लाखांची मागणी करण्यात आली. पाच दिवस सुरु असलेल्या मारहाणीनंतर एका बाँड पेपर आणि चेकबुक वर त्याच्या सह्या घेऊन 28 तारखेला दुपारी बारा वाजता लातूर येथील रेल्वे स्टेशनवर त्याला आणून सोडण्यात आले.

माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा फोन कॉल व्हायरल झाला. तसेच, मारहाणीचा व्हिडिओही देखील समाज माध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर, शहर पोलीस उपाधीक्षक भागवत फुंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या प्रकरणातील दोषी डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्याचे दोन सहकारी फरार झाले आहेत. आम्ही गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास सुरू असल्याचे फुंदे म्हणाले.

Web Title: beaten with chili pepper in his private parts and kept in captivity for four days

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here