Home अहमदनगर अहमदनगर: ग्राहकाची महावितरण अधिकाऱ्यास मारहाण

अहमदनगर: ग्राहकाची महावितरण अधिकाऱ्यास मारहाण

Breaking News | Ahmednagar: थकीत वीज बिल भरल्यानंतर तोडलेले वीज कनेक्शन जोडले, परंतू लाईट चालू न झाल्याने वीज ग्राहकाने महावितरण अधिकाऱ्यांना मारहाण करुन धमकी दिल्याने खळबळ उडाली.

Customer's assault on General Distribution Officer

राहुरी : सहा महिन्यांचे थकीत वीज बिल भरल्यानंतर तोडलेले वीज कनेक्शन जोडले, परंतू लाईट चालू न झाल्याने वीज ग्राहकाने महावितरण अधिकाऱ्यांना मारहाण करुन धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार राहुरी फॅक्टरी येथे घडला.

माधव अमृता हिलीम (३१) हे देवळाली प्रवरा येथे राहतात. ‘महावितरण’ मध्ये ते वरीष्ठ तंत्रज्ञ आहेत. राहुरी फॅक्टरी येथे अंबिका नगरमधील गयाबाई शाहाराम शिंदे यांचे वीज बील सहा महिन्यांपासून थकले होते. दि. ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता माधव हिलीम यांनी कर्मचाऱ्यांसह शिंदे यांचे वीज कनेक्शन कट केले. दुपारी शिंदे यांनी वीज बिल भरल्यानंतर वीज कनेक्शन पुन्हा जोडले, मात्र सायंकाळपर्यंत

लाईट चालू झाली नाही. शिंदे यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना मोबाईल करुन, सांगितले की, ‘वीज बील भरुनदेखील लाईट सुरु झाली नाही.’ यावर माधव हिलीम, सचिन बोडखे, भागीनाथ माळवदे आदी कर्मचारी शिंदे यांच्या घरी गेले. गयाबाई शिंदे यांचा पती शाहाराम शिंदे त्याने हिलीम यांना शिवीगाळ केली. गचांडी पकडून मारहाण केली. ‘तुम्ही बाहेर गावचे आहात, येथे कसे काम करता, कसे येथुन बाहेर निघुन जाता, ते मी पाहतो,’ असे म्हणत धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

याप्रकरणी हिलीम यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शाहाराम शिंदे (रा. अंबिकानगर, राहुरी फॅक्ट्ररी ता. राहुरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पो. नि. संजय ठेंगे करीत आहेत.

Web Title: Customer’s assault on General Distribution Officer

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here