Home अकोले संगमनेर: गतिमंद मुलीवर अत्याचार; अकोलेतीलआरोपीस १० वर्षे सक्तमजुरी

संगमनेर: गतिमंद मुलीवर अत्याचार; अकोलेतीलआरोपीस १० वर्षे सक्तमजुरी

Breaking News | Akole: गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायायाचे न्यायाधीश डी. एस घुमरे यांनी १० वर्ष सक्तमजुरी व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Aggressive Girl Abused 10 years hard labor for the accused

संगमनेर : अकोले तालुक्यातील सोपान आप्पाजी गवांदे या आरोपीस गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायायाचे न्यायाधीश डी. एस घुमरे यांनी १० वर्ष सक्तमजुरी व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

अजित उर्फ पप्पू रंगनाथ फलके व सोपान अप्पाजी गवांदे या दोघांनी गतिमंद पणाचा फायदा घेत एका मुलीवर अत्याचार केला होता. त्यातून ती गर्भवती राहिली होती, अशी फिर्याद पीडित मुलीच्या आईने आळेफाटा पोलिसांकडे केली होती. त्यानुसार त्या दोघांच्या विरोधात आळेफाटा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा अकोले पोलिसांकडे वर्ग केला.

जिल्हा न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील बी.जी. कोल्हे यांनी प्रबळ युक्तिवाद करताना दहा साक्षीदार न्यायालयासमोर सादर केले. या प्रकरणातील मुख्य आरोपी सोपान अप्पाजी गवांदे याला १० वर्ष सश्रम कारावास आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर दुसरा संशयीत आरोपी अजित उर्फ पप्पू रंगनाथ फलके याची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार प्रवीण डावरे, महिला पोलिस स्वाती नाईकवाडी, नयना पंडित, दीपाली रहाणे, प्रतिभा थोरात व अकोले पोलिसांनी सहाय्य केले.

Web Title: Aggressive Girl Abused 10 years hard labor for the accused

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here