Home श्रीरामपूर अहमदनगर: बदनामीची धमकी देत तरुणीवर अत्याचार

अहमदनगर: बदनामीची धमकी देत तरुणीवर अत्याचार

Breaking News | Ahmednagar: तरुणीस वेगवेगळी आमिषे दाखवून, सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. तसेच तिच्या इच्छेविरुध्द बळजबरीने शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची घटना.

Rape on a young woman under the threat of defamation

श्रीरामपूर: शहरातील एका तरुणीस वेगवेगळी आमिषे दाखवून, सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. तसेच तिच्या इच्छेविरुध्द बळजबरीने शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली, याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.१९ रोजी रात्री ८ च्या सुमारास अश्पाकने फोन करून खुप अर्जट काम आहे, असे सांगून थत्ते ग्राउंड येथे सदर तरुणीस बोलावले. बळजबरीने गाडीवर बसवून एका घरात घेऊन गेला. तेथे सदर तरुणीस जिवे मारण्याची धमकी दिली तसेच सोशल मीडियावर बदनामी करेल अशी धमकी देवून इच्छेविरुध्द बळजबरीने अत्याचार केला.

पोलीस स्टेशन येथे सदर घटनेबाबत फिर्याद देण्यासाठी येत असताना रस्त्यात वसीम प्यासी व त्याच्यासोबत असलेला परवेज यांनी सदर तरुणीला तु पोलीस स्टेशनला तक्रार देऊ नकोस, तक्रार दिली तर तुच फसशील व आम्ही तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. मात्र, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धीर दिल्याने फिर्याद दाखल करण्यात आली. याप्रकरणी अश्पाक याच्याविरोधात अत्याचार केल्याबाबत व वसीमप्यासी, परवेज यांच्याविरोधात धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही आरोपी पसार असून पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Rape on a young woman under the threat of defamation

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here