Home संगमनेर संगमनेरात शिक्षकाने बँकेतून २ लाख काढले, अन चोरट्यांनी लुटले!

संगमनेरात शिक्षकाने बँकेतून २ लाख काढले, अन चोरट्यांनी लुटले!

Breaking News | Sangamner: निवृत्त शिक्षकाला लुटल्याची घटना समोर.

teacher withdrew 2 lakhs from the bank and was robbed by thieves

संगमनेर : संगमनेर तालुक्यात लुटीच्या घटना सुरूच आहेत. आता त्यातच एका निवृत्त शिक्षकाला लुटल्याची घटना समोर आली आहे.  बँकेतून २ लाख रुपये काढून सेवानिवृत्त शिक्षक सायकलवरून घरी जात असताना दुचाकीहून अचानक आलेल्या दोघांनी गर्दीतून या सेवानिवृत्त शिक्षकाचे दोन लाख रुपये चोरून नेल्याची  घटना बुधवारी (दि. १४) दुपारी १२:४५ वाजेच्या सुमारास शहरातील जय जवान चौक परिसरात घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

उत्तम बाळाजी वर्षे (वय ६२, सेवानिवृत्त शिक्षक, रा. ओमसाई कॉलनी, गोल्डन सिटी, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम, इंग्रजी ग्रामर आणि बरेच काही – एजुकेशन पोर्टल 

वर्पे हे शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गोल्डन सिटी परिसरात राहतात. शहरात जाणता राजा मार्गावर स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. तेथून त्यांनी पैसे काढले अन कापडी पिशवीत त्यांनी दोन लाख रुपये ठेवून ती पिशवी सायकलला लावून ते घरी जात होते. जय जवान चौक परिसरातील रसाळ डॉक्टरांच्या शेजारील गल्लीतून जाता असताना काळ्या रंगाच्या दुचाकीहून आलेल्या दोघांनी गर्दीतून त्यांच्या सायकलला लावलेली पिशवी काढून घेत गाडीवर पसार झाले आहे. या दोन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहे.

Web Title: teacher withdrew 2 lakhs from the bank and was robbed by thieves

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here