Home Accident News वनरक्षक पदासाठी पात्र ठरलेल्या बहिणीसह दोघा भावंडांचा बळी,  तिघा सख्ख्या भावंडांना चिरडले

वनरक्षक पदासाठी पात्र ठरलेल्या बहिणीसह दोघा भावंडांचा बळी,  तिघा सख्ख्या भावंडांना चिरडले

Breaking News | Accident: जागीच मृत्यू: वनरक्षकपदाच्या चाचणीहून परतताना घाला.

Accident Victims of two siblings, including a sister, crushed all three siblings

छत्रपती संभाजीनगर : एकमेकांना ओव्हरटेक करण्याची स्पर्धा करणाऱ्या दोन हायवाचालकांपैकी एका बेदरकार हायवाचालकाने दुचाकीवरील तिघा भावंडांना चिरडले. वनरक्षक पदासाठी पात्र ठरलेल्या बहिणीसह दोघा भावंडांचा या भीषण दुर्घटनेत बळी गेला. अपघातानंतर चालक भरधाव वेगाने वाहन दामटत पसार झाला. प्रतीक्षा भगवान अंभोरे (वय २२), प्रवीण (२८) आणि प्रदीप ऊर्फ लखन (२५) अशी या तिघा सख्ख्या भावंडांची नावे आहेत. तिघेही जिंतूर तालुक्यातील अकोली गावचे रहिवासी आहेत. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास बीड बायपासवर हा अपघात झाला.

प्रतीक्षा ही पदवी अभ्यासक्रमापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. मुंबई पोलिस भरतीतही ती प्रतीक्षा यादीत होती. वन विभागाच्या जागा निघाल्यावर तिने शहरात राहून खासगी शिकवणी लावली. नेटाने तयारी केली. तिला लेखी परीक्षेत १२० पैकी ८४ गुण मिळाले होते. मैदानी चाचणीसाठीही पात्र ठरल्यावर कागदपत्रांची पडताळणी झाली. ८ फेब्रुवारीला मैदानी चाचणी असल्याने ती ७ फेब्रुवारीला भाऊ प्रदीपसोबत जिंतूर येथून शहरात आली. दोघेही सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगरात राहणारा मोठा भाऊ प्रवीणच्या खोलीवर थांबले. गुरुवारी पहाटे मैदानी चाचणीसाठी तिघेही दुचाकीने (एमएच २१ सीबी ३२२९) शेंद्रा एमआयडीसीत गेले. प्रतीक्षाने तेथे मैदानी चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. तिला ८० पैकी ५० गुणही मिळाले होते.

चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण, पण…

प्रतीक्षाने यशस्वीरीत्या चाचणी पूर्ण केल्यानंतर शेंद्रा येथून तिघेही दुचाकीने परत निघाले. बीड बायपासने बाळापूर फाट्याजवळ येताच पाठीमागून दोन भरधाव हायवा आले. त्यांच्यात एकमेकांना ओव्हरटेक करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. अतिशय बेदरकारपणे येणाऱ्या या हायवापैकी एकाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. जोरात धडक बसल्याने ते तिघेही रस्त्यावर कोसळले. त्यानंतर हायवाचालक त्यांना चिरडून पसार झाला. चिकलठाणा पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यावर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Accident Victims of two siblings, including a sister, crushed all three siblings

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here