ट्रकची दुचाकीला धडक पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar Accident: घाट उतरताना चालकाचे नियंत्रण सुटले समोर चाललेल्या दोन दुचाकींना पाठीमागून जोराची धडक बसून झालेल्या अपघातात एका दुचाकीवरील पती-पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला.
अहमदनगर: घाट उतरताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोर चाललेल्या दोन दुचाकींना पाठीमागून जोराची धडक बसून झालेल्या अपघातात एका दुचाकीवरील पती-पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा दुचाकीस्वार जखमी झाला आहे. काल, रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपुलावर ही घटना घडली.
अपघातात अनिल बाळासाहेब पवार (वय २८), त्यांची पत्नी सोनाली अनिल पवार (वय २२) मुलगा माऊली अनिल पवार (वय ६) व आठ महिन्यांची मुलगी चिऊ अनिल पवार (सर्व रा. वडगाव सावताळ, ता. पारनेर) यांचा मृत्यू झाला आहे. आठ महिन्यांच्या मुलीचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दुसऱ्या दुचाकीवरील भगवान भिकाजी आव्हाड (वय ५८ रा. पांगरमल, ता. नगर) हे जखमी झाले आहेत.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
अनिल पवार हे त्यांच्या दचाकीवरून (अॅक्टीव्हा) पत्नी व दोन मुलांसह नगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्याने नगरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होते. घाट उत्तरल्यानंतर हटिल लिनियम पार्कच्या पुढे गेल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने आलेला ट्रकची पवार यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. त्याच वेळी समोर जाणान्या आणखी एका दुचाकीलाही ट्रकची धडक बसली. अपघात ऐचडा भीषण होता की अॅक्टीव्हा दुचाकीवरील अनिल पवार यांच्यासह पत्नी मोनाली, मुलगा माऊली च मुलगी चिऊ यांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. त्याची ओळख पटल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, स्थानिकांनी अपघाताची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहा. पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी अपघातस्थळी धाव घेतली तर उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मयतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला त्यानंतर मयताची ओळख पटली. अपघातानंतर नगर- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बाहनांच्या रांगा लागल्या होत्या, पोलिसांनी अपघातग्रस्त बाहने बाजूला करून बाहतुक सुरुळीत केली.
Web Title: truck collided with a two-wheeler, killing a husband and wife and two children
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study